खाजगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू ; संतप्त जमावाने बस जाळली
   दिनांक :10-May-2019
लाखांदूर: नागपूर वरून अर्जुनी/मोर करिता प्रवाशी घेऊन बाबाश्री कंपनीची खाजगी बस येत असतांना लाखांदूर चुलबंद नदीचा  पूल पार करताच समोरून लाखांदूर कडून खैरी ला जात असतांना या बसने एका मोटारसायकलला धडक दिली. यात मोटार सायकल चालक रमेश बाळकृष्ण पिलारे 32 रा.खैरी /पट हा जागीच ठार झाला. ही घटना काल रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटना घडताच संतप्त जमावाने सदर बस जाळली. यामुळे लाखांदूर पवनी मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. जमावाला पांगविण्यासाठी पवनी,दिघोरी, लाखांदूर येथील पोलीस ताफा बोलविण्यात आला होता.
 

 
 
तालुक्यातील खैरी /पट येथील रहिवासी रमेश बाळकृष्ण पिलारे हा गावातीलच मुलाचा लग्न मडेघात येथून आटोपून मोटारसायकलने एकटाच खैरी कडे जात होता. दरम्यान बाजार समिती परिसरात समोरून बाबाश्री ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच गावातील १०० ते १५० लोक घटनास्थळी पोहचले.व संतप्त जमावाने बस जाळली.