IPL 2019; 'कॅप्टन कूल' धोनीला विक्रमाची संधी

    दिनांक :10-May-2019
विशाखापट्टणम, 
 
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आठव्यांदा इंडियन प्रीमिअर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. गतविजेत्या चेन्नईला क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात सुपर किंग्स आणि धोनी या दोघांनाही विक्रमाची नोंद करण्याची संधी आहे.
 

 
 
आयपीएलमध्ये विजयाचे शतक साजरे करण्यासाठी चेन्नईला केवळ एक विजय हवा आहे. चेन्नईने 163 सामन्यांत 99 विजय मिळवले आहेत आणि त्यांचा विजयाची टक्केवारी ( 61.41%) ही अन्य संघापेक्षा चांगली आहे. त्यामुळे चेन्नईने आज दिल्लीवर विजय मिळवल्यास आयपीएलमध्ये 100 सामने जिंकणारा तो मुंबई इंडियन्सनंतर दुसरा संघ ठरणार आहे. मुंबईने 186 सामन्यात 106 विजय मिळवले आहेत. याच सामन्यात धोनीलाही एक विक्रमाची संधी आहे. या सामन्यात तीन बळी टिपल्यास आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा यष्टिरक्षकाचा मान त्याला मिळेल. कोलकाता नाईट रायडर्सचा दिनेश कार्तिक 131 बळींसह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. धोनीच्या नावावर 129 बळी आहेत आणि त्यात 91 झेल व 38 यष्टिचीतचा समावेश आहे.