मिलिंद रेगे मुंबई क्रिकेटच्या निवड समितीचे अध्यक्ष

    दिनांक :10-May-2019
मुंबई,
 
आगामी क्रिकेट हंगामासाठी मुंबईच्या वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्षपद माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे, महिलांच्या निवड समितीचे प्रमुखपद माजी क्रिकेटपटू वृंदा भगत यांच्याकडे देण्यात आले आहे.
 
 
 
७० वर्षीय रेगे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना ३६८३ धावाांत १२६ बळी घेतले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून गुरुवारी पुरुष आणि महिलांच्या विविध वयोगटांच्या निवड समित्या जाहीर केल्या. यापैकी १९ आणि १६-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्षपद अनुक्रमे संजय पाटील आणि मंदार फडके यांना सोपवले आहे. याचप्रमाणे रवी कुलकर्णी हे १४ आणि १२-वर्षांखालील वयोगटाच्या निवड समितीचे प्रमुख असतील.