चारा तोडायला गेला अन् वीज ताराना चिकटला
   दिनांक :10-May-2019
सामदा मार्गावरील घटनेत युवकाचा मृत्यू
 
दर्यापूर: घरातील पाळीव जनावरांसाठी चारा आणावयास गेलेल्या युवकाचा हायपर टेन्शन वीज ताराना स्पर्श झाल्याने मृत्य झाला. ही घटना शुक्रवारी दूपारी 4.30 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी गर्दी झाली होती.
 

 
 
 
इकबाल खान हमीदुलल्ला खान (वय 25 रा . बडापुरा, बाभळी) असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी 4 वाजता इकबाल खान जनावरांचा चारा आणण्यासाठी सामदा रस्त्यावर वासुदेव विल्हेकर यांच्या शेतातील धुर्‍यावर असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढला. त्या झाडा जवळून हायपर टेन्शन विद्युत तारा गेल्या आहेत. चारा तोडताना अचानक त्याचा विद्युत तारांना स्पर्श झाला. दुपारच्या रण रणते उन्ह असल्यामुळे या रस्त्याने कुणीही नव्हते. बराचवेळ तो तारांना चिकटकून राहीला व त्यानंतर मृतावस्थेतच तो झाडावर लटकला. घटना लक्षात आल्यावर घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली. पोलिसांनी आरोग्य विभागाच्या रुग्णवाहीकेच्या मदतीने त्याला झाडावरून खाली आणले. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनास्थळी जि.प.चे आरोग्य सभापती बलवंत वानखडे, काँग्रेसचे सुधाकर भारसाकळे, शिवसेनेचे बबन विल्हेकर, अमोल जाधव, पालिकेचे माजी उपाध्यक्ष शादत खा पठाण, गुड्डू पटेल, मनसेचे जयंत वाकोडे यांनी भेट दिली. मृत युवकांच्या पाठीमागे आई, वडील, चार भाऊ असा आप्त परिवार आहे. विशेष म्हणजे युकाने रमजानचा रोजा ठेवला होता.