दारूड्या एसटी बसचालकाला सहा महिने तुरुंगवास

    दिनांक :10-May-2019
 पुणे: दारूच्या नशेत राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बस चालवणार्‍या चालकाला सहा महिने तुरुंगवास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
 

 
 
माहितीनुसार, वाहक शिवाजीराव प्रभाकर राऊत यांनी केलेल्या तक्रारीनुसार, कुलदीप महादेव कराळे ( दोघेही उस्मानाबाद) हा 23 एप्रिल 2018 रोजी शिवाजीनगर ते उस्मानाबाद दरम्यान एसटी बस दारूच्या नशेत चालवत असताना आढळून आला. चालकाची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याने दारू प्राशन केली असल्याचा अहवाल प्राप्त झाला. याविरोधात हडपसर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी चालकाने केलेले कृत्य हे गंभीर आहे. घ(वृत्तसंस्था)