कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा झटका; उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला
   दिनांक :10-May-2019
नवी दिल्ली,
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना जोरदार धक्का दिला आहे. बिहारमध्ये जवळपास 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे समान वेतन मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने  बिहार सरकारचे अपील मंजूर करत पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन देण्याचे आंदोलक शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील केले होते . त्यात सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे.
 
 
 
बिहारमध्ये कंत्राटी शिक्षकांचे वेतन सध्या 22 ते 25 हजारांच्या दरम्यान आहे. जर न्यायालयाचा निर्णय शिक्षकांच्या बाजूने  लागला असता तर शिक्षकांना 35-40 हजार रुपये पगार मिळाला असता. शिक्षकांच्या बाजूने देशातील दिग्गज वकिलांनी लढाई लढली होती.