प्लास्टिकचं खेळणं गिळल्याने प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
   दिनांक :10-May-2019
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीश यांची मुलगी बुधवारी ८ मे रोजी रात्री राजकोटमधील आपल्या घरी प्लास्टिकच्या खेळण्यांसोबत खेळत होती. यावेळी खेळता-खेळता मुलीने खेळणं आपल्या तोंडात घेतलं आणि चुकून गिळलं. खेळणं गिळल्याने ते घशात अडकलं होतं.
 
 
खेळणं घशात अडकल्याने मुलीला श्वास घेताना त्रास होत होता. अखेर गुदमरल्याने मुलीचा मृत्यू झाला. मुलीला वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. मुलीच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले, पण यश आलं नाही. गुरुवारी प्रतीश यांना शुटिंगसाठी सेटवर पोहोचायचं होतं, पण आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच सर्व काम सोडून ते घरी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीश आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन राजकोटला रवाना झाले होते. तिथेच मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही बातमी कळताच टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतीश यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तारक मेहता का उलचा चश्मा, क्राइम पेट्रोल आणि प्यार के पापडसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.प्रतीश यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तारक मेहता का उलचा चश्मा, क्राइम पेट्रोल आणि प्यार के पापडसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.