यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती
   दिनांक :10-May-2019
मुंबई,
 
राज्याचे मावळते मुख्य सचिव असलेले यू.पी.एस मदान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यू.पी.एस मदान यांचा मुख्य सचिवपदाचा दर्जा मिळणार आहे. मदान यांची नियुक्ती या वर्षीच्या मार्च महिन्यात राज्याच्या मुख्य सचिवपदी करण्यात आली होती. मदान हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्य सचिवपदाच्या आधी त्यांच्याकडे राज्यातील वित्त विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी होती. येत्या ऑक्टोबरमध्ये यू.पी.एस मदान निवृत्त होणार आहेत.
 

 
यू.पी.एस मदान यांच्या जागी राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती झाल्याने मुंबई महापालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.