'कुत्ता गोळी'ची विक्री करणाऱ्या दोघांना नाशिकात अटक

    दिनांक :10-May-2019
नाशिक: गांजला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या आमली कुत्ता गोळीची विक्री करणाऱ्या दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या आधी मालेगावमध्ये या कुत्ता गोळीचा भांडाफोड झाला होता. नीटरकेअर (nitracare) या नावाने असलेली आणि कुत्ता गोळी म्हणून सांकेतिक भाषेत ओळखली जाणारी ही गोळी गांजला पर्याय म्हणून अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या द्वारका परिसरातील बस स्टॅन्ड परिसरात दोन तरुणांना पोलिसांनी कुत्ता गोळी विकतांना रंगे हात पकडले. शहरातील ही अश्या प्रकारची पहिलीच कारवाई असल्याचे सांगितल्या जात आहे. २१ आणि २२ वर्षीय तरुणांकडून पोलिसांनी तब्बल ३०० गोळ्या जप्त केल्या आहेत. या गोळ्यांची खरेदी विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तविला जात आहे.