शोपियांमध्ये चकमक; इसिसच्या कमांडरचा खात्मा
   दिनांक :10-May-2019
श्रीनगर,
आज पहाटे सोपोरच्या अमशीपोरात सुरक्षा दलांची चकमक झाली. यामध्ये इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरचा कमांडर इशफाक अहमद सोफीचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. झाकीर मूसासोबतच सोफी इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ऍण्ड काश्मीरच्या (आयएसजेके) प्रमुख कमांडरपैकी एक होता. झाकीर मूसाला पकडण्यात अद्याप सुरक्षा दलांना यश आलेले नाही. तो पंजाबमध्ये लपल्याचे वृत्त गेल्याच आठवड्यात आले होते.
 
 

इशफाक अहमद सोफी जम्मू-काश्मीरच्या सोपोरचा रहिवासी होता. शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. तो दहशतवाद्यांमध्ये अब्दुल्ला भाई नावानं ओळखला जायचा. त्याच्याकडून शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला. सोफीला ठार करण्यात यश आल्यानंतर सोपोरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी परिसरातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहे.