TB Exclusive- भंवर गावात अन्नातून ७० जणांना विषबाधा

    दिनांक :11-May-2019
- लग्नाची पंगत पडली महागात
 
धारणी: तालुक्यातील भंवर नावाच्या गावातल्या लग्न समारंभात विषाक्त भेाजन प्राप्त केल्याने अंदाजे ७० आदिवासींना विषाबाधा झालेली आहे. साद्राबाडी तथा कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्राचे अस्थाई शिबिर भंवर गावात लावण्यात आलेले असून २० जणांना साद्राबाडी दवाखान्यात तर काहींना धारणी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरीत गावातच उपचार घेत आहे. सदर घटना शनिवारी उघडकीस आली.
 
धारणीपासून ४५ किमी अंतरावरील भंवर नावाच्या गावात एका लग्न समांरभात भोजन केल्याने ७० पेक्षाजास्त लोकांना विषबाधा झाली. विलंबाने प्राप्त माहिती प्रमाणे साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४० जणांना भरती केल्यावर गंभीर प्रकृतीवाल्यांना शनिवारी रात्री ९ वाजता धारणी दवाखान्यात आणण्यात आले. गावात शिबिर लावून गावातील सर्व लोकांची तपासणी सुरु करण्यात आलेली आहे. माहितीप्रमाणे दिव्या जावरकर (९), राधा कास्देकर (९), दिपीका जांबेकर (७) तथा सुमन भिलावेकर (३५) सर्व रा. भंवर हे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.  

 
रुग्णांमध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणात असल्याने पूर्ण गाव दहशतीत आलेले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णांची पाहणी व आवश्यक सहाय्यतेसाठी भाजप तालुकाध्यक्ष आप्पा पाटील यांचे नेतृत्वात भाजयुमोचे शिष्टमंडळ भंवर गावात जाणार आहेत. शेवटची माहिती आल्यावर जवळपास सर्वच रुग्ण धोक्याबाहेर झाल्याचे समजलेले आहे. एकूण स्थिती आरोग्य विभागाने नियंत्रणात आणलेली आहे.