तंत्रज्ञान मानवहिताचे, पण गैरवापर नको

    दिनांक :11-May-2019
- डॉ. हेमंत पांडे यांचे मत
- आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस  
 
 
तभा ऑनलाईन  
नागपूर, 
तंत्रज्ञान हे शेवटी मानवाच्या हिताचेच असून, त्याचा गैरवापर होता कामा नये, असे सुस्पष्ट मत विज्ञान अभ्यासक डॉ. हेमंत पांडे यांनी व्यक्त केले. भारतात ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून पाळला जातो. याच दिवशी पोखरणमध्ये अणू चाचणी घेऊन भारताने ‘हम भी किसीसे कम नहीङ्क हे दाखवून दिले. माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्ताने डॉ. हेमंत पांडे म्हणाले की, तंत्रज्ञान ही प्रत्येक देशाची ताकद असते. ज्या देशात तंत्रज्ञान जेवढे जास्त तेवढी चांगली प्रगती झाली, असे समजले जाते. जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर होतो, तेवढा संबंधित देश प्रगत समजला जातो. चीन हा सर्वात प्रगत देश समजला जातो. तंत्रज्ञान हे देशाच्या प्रगतीचे मापक असते.
 
तंत्रज्ञान हे मानवाच्या उपयोगाचे असते. तंत्रज्ञानात वाढ ही प्रगती असते. प्रगती हळूहळू होत असते. भारताचे उदाहरण घेतल्यास भारताची चांगली प्रगती होऊ लागली आहे. मोबाईल हे त्याचे उत्तम उदाहरण ठरेल. संगणकानंतर भ्रमणध्वनीचा वापर वाढला आहे. जगात सर्वात स्वस्त इंटरनेट भारतातच आहे. भ्रमणध्वनी हा लघु संगणक समजला जातो. केवळ संभाषणच नव्हे तर मजकुर, छायाचित्र वगैरे कमीतकमी वेळेत पाठवता येते.
 
अवकाश तंत्रज्ञान हे दुसरे उदाहरण घेता येईल. आकाशातल्या आकाशात उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान भारतात विकसित झाले आहे. अवकाश संशोधनात भारताचा चवथा क्रमांक लागतो. संरक्षण क्षेत्राचेही तसेच. भारत वर्षभरात चंद्रयान पाठवणार आहे. निरनिराळ्या तंत्रज्ञानात भारत प्रगत ओळखला जातो. हिèयाला पैलू पाडणाèया तंत्रज्ञानात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया योजना आणली ती विविध तंत्रज्ञानात भारताने प्रगती साधावी यासाठीच. या योजनेचे चांगले परिणाम अलीकडे जाणवू लागले आहेत. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. भारताची मान उंचावली आहे.
 
या सर्व तंत्रज्ञानाचा शेवटी मानवालाच उपयोग होतो. पण हे सहजासहजी साध्य झालेले नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग होतो, हा सकारात्मक विचार झाला. त्याचा दुरुपयोग होता कामा नये. एखाद्या आजारावर एखादे औषध येते. पण, त्यावर आधी अनेक वर्षे सखोल संशोधन झालेले असते. त्याच्या बèया-वाईट परिणामांचाही विचार झालेला असतो. मानवाला उपयोगी म्हणून ते तंत्रज्ञान तातडीने अंमलात येते.
 
सखोल संशोधनाअंती तंत्रज्ञान अंमलात आलेले असले तरी त्यात काही त्रुटी असल्याचे त्याच्या वापरातून निदर्शनास येते. मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे पर्यावरणावर परिणाम होतो, हे नंतर निदर्शनास आले. आता त्यावर संशोधन सुरू असून काहीतरी तोडगा नक्कीच निघेल. अवकाश संशोधनाचेही तसेच. याआधी अनेकदा अपयश आले आहे. पण, संशोधकांनी सखोल संशोधन केल्याने तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले. शेवटी तंत्रज्ञान हे मानव हिताचे आहे. त्याचा सकारात्मकच वापर व्हावा, असे डॉ. पांडे म्हणाले