नागपुरात ऑटो रिक्षा पेटून महिला जखमी

    दिनांक :11-May-2019
नागपूर,
ऑटो रिक्षा उलटल्यानंतर तिने पेट घेतल्याने एक वृद्ध महिला किरकोळ भाजली. तिची सूनही जखमी असून त्या दोघींनी सेनगुप्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा पेटल्याने तिचा सांंगाडा तेवढा शाबुत राहिला. 

 
 
अमरावती मार्गावरील भरतनगर चौकात शनिवारी सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. काही मिनिटे पेटलेली ऑटो रिक्षा पाहून लोक शहारले. रमाई हिरालाल गौर व भारती रितेश गौर ही जखमी महिलांची नावे आहेत.