ॲक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचं निधन
   दिनांक :11-May-2019
मुंबई,
 
अभिनेत्री शबाना आजमी, जया बच्चन, नसीरुद्दीन शहा, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक अभिनेत्यांना घडवणारे ॲक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचं शुक्रवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी मिथिका, रोहित आणि राहुल ही दोन मुले आहेत. त्यांच्या निधनाने अभिनयाचं विद्यापीठ हरवल्याची प्रतिक्रिया बॉलिवूडमधून व्यक्त होत आहे.
 
 
 
शुक्रवारी रात्री ९.३० वाजता प्रदीर्घ आजाराने रोशन तनेजा यांचं झोपेतच निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. आज दुपारी ४.३० वाजता सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी होणार आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना त्यांनी अभिनयाचे धडे दिले होते. त्यांनी मुंबईत ॲक्टिंग स्कूलची स्थापना केली होती. अनेक नामवंत अभिनेत्यांनी त्यांच्या ॲक्टिंग स्कूलमध्ये येऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे. विद्यार्थ्यांना अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीचं शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचं काम तनेजा यांनी केलं. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला आहे.