ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर मात

    दिनांक :11-May-2019
ब्रिस्बेन,
 
विश्वचषकाची तयारी म्हणून खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. स्टीव्ह स्मिथच्या नाबाद ९१ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या ७० धावांच्या बळावर हा विजय मिळवता आला . डकवर्थ-लुईस नियमाच्या जोरावर पाच गड्यांनी न्यूझलंडचा पराभव करण्यात आला. 
 
 
त्याआधी विल यंग याच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ५० षटकात ९ बाद २८६ पर्यंत मजल गाठली होती. अंधुक प्रकाशामुळे सामना थांबविण्यात आला, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४४ षटकात पाच बाद २४८ धावा उभारल्या होत्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार त्यांना ४४ षटकात विजयासाठी २३३ धावांची गरज होती.
माजी कर्णधार स्मिथने सलग दुसऱ्यांदा अर्धशतकी खेळी करीत ९१ धावा ठोकल्या. मॅक्सवेलदेखील फॉर्ममधये आहे. त्याने ४८ चेंडूत ७० धावांचे योगदान दिले. बुधवारी त्याने वेगवान ५२ धावा फटकविल्या होत्या.