IPL 2019; चेन्नईने नोंदवलं विजयाचं शतक

    दिनांक :11-May-2019
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ६ गडी राखून दिल्ली कॅपिटल्स संघावर मात केली. या विजयासह चेन्नईचा संघ रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत पोहचला असून, या लढतीत चेन्नईला मुंबईशी दोन हात करावे लागणार आहेत. 
 

 
दरम्यान दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी १५२ धावांचं आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईसाठी हा विजय अतिशय महत्वाचा मानला जात आहे. आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाने आपल्या शंभराव्या विजयाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा चेन्नई आयपीएलमधला दुसरा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या नावावर आयपीएलमध्ये १०८ विजय जमा आहेत.