आजचे राशी भविष्य, दि. ११ मे २०१९
   दिनांक :11-May-2019

मेष - कोणत्याही नकारात्मक कामात अडकाल तर महत्त्वाची संधी हातून जाण्याची शक्यता आहे. आज कोणताही निर्णय घेऊ नका. चिडचीड होईल. दिवसभर सावध राहा. विचार करुन बोला. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वाहन चालवताना काळजी घ्या. तब्येत ठीक राहील. चांगले जेवण मिळेल.

वृषभ - मित्र आणि भावंडांकडून सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. विचार केलेली कामं करु शकता. संपत्तीच्या कामाकडे लक्ष द्या. आजचा दिवस वैयक्तिक जीवन, पैसा आणि कुटुंब यात व्यतित होईल. महत्त्वाच्या कामांची योजना आखाल. तुमच्या जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

मिथुन - नवीन काम किंवा व्यवसायात एखादी महत्त्वाची डिल समोर येऊ शकते. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन संधी मिळू शकते. विचार केलेली कामं पूर्ण होतील. कामं लवकर पूर्ण होतील. दररोजची कामं पूर्ण करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. पुढे जाल. महत्त्वपूर्ण कामांसाठी दिवस चांगला आहे. समस्या संपतील.

कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमध्ये हलगर्जीपणा करु नका. विचार केलेली कामं पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. कोणत्याही कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

सिंह - दररोजची कामं पूर्ण होण्यात अडचणी येतील. अनेक प्रकारचे विचार मनात येतील. पैसे सांभाळून ठेवा. गुंतवणूकीच्या बाबतीत विचार करा. मनात काळजी राहील. कटू बोलू नका. कोणतीही योजना आज आखू नका. कामात मन न लागल्याने समस्या वाढू शकतात. तब्येत चांगली राहील.

कन्या - व्यवसायात एखाद्या नवीन योजनेवर काम सुरु करु शकता. जोडीदाराकडून मदत आणि सुख मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. कामं पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण व्यक्तींशी भेट होऊ शकते. अचानक नवीन कल्पना मनात येऊ शकते. कामाकडे लक्ष द्या. तब्येत ठीक राहील. उत्साही वाटेल.

तुळ - दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन तुमची कामं पूर्ण करा. कामात मन लागेल. चांगल्या संधी मिळतील. त्याचा फायदा घ्या. अचानक मनात काही विचार येऊ शकतात जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबत असलेल्या संबंधांत अनुकूलता राहील. तब्येत चांगली राहील.

वृश्चिक - नोकरी, व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होऊ शकते. गोंधळ होईल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. कामात समस्या येऊ शकतात. कोणतीही समस्या असल्यास सावधपणे सोडवा. समस्या निर्माण करणारे लोक आसपासच राहतील. तब्येतीत चढ-उतार राहील.

धनु - आर्थिक प्रश्न सोडवले जाऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखी राहील. समजदारी आणि नम्रतेने समस्या सो़डवल्या जाऊ शकतात. दररोजच्या कामातून धनलाभ होऊ शकतो. मुलांकडून मदत होईल. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. नोकरी, व्यवसायातील अडचणी संपतील. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

मकर - आज दिवसभर सावध राहावे लागेल. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. सावध राहा. मनात गोंधळ राहील. जुन्या गोष्टींमध्ये अडकाल. कोणत्याही समस्येचं निराकरण लगेच होणार नाही. कामात मन लागणार नाही. खास कामं अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

कुंभ - व्यवसायात नवीन काही करणाच्या नादात समस्या वाढू शकतात. मनात सतत गोंधळ असल्याने कामात मन लागणार नाही. नोकरी, व्यवसायात घाई करु नका. कोणतीही जोखीम घेऊ नका. कामाच्या ठिकाणी टेन्शन वाढू शकते. केलेल्या कामाचे परिणाम न मिळाल्यास टेन्शन घेऊ नका. तब्येतीच्या बाबतीत दिवस ठिक नाही. जेवण वेळेवर करा.

मीन - ऑफिसमध्ये स्वत:ला नियंत्रणात ठेवा. कामाच्या ठिकाणी समस्या जाणवतील. योजना सफल होऊ शकतात. पुढील कामांसाठी योजना आखणं सोपं जाईल. रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. योग्यता आणि अनुभव पाहून काम करा. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.