हिंगणी -शिवणगाव मार्गावरील मल्हार हाँटेल बनला अय्याशीचा अड्डा

    दिनांक :11-May-2019
पत्रकारांनी केला भंडाफोड 
पोलिस येण्या पुर्वी प्रेमीयुगलांनी काढला पळ.
 
 
 सेलू : तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या हिंगणी शिवणगाव रस्त्यावरील दुमजली हाँटेल मल्हार सध्या प्रेमी युगुलांसाठी अय्याशीचा अड्डा बनला असून येथे उघडपणे हा धंदा उजळ माथ्याने हाँटेलमालक करीत आहे. येथे हाँटेलवर आलेल्या एका प्रेमी युगुलांचा रस्त्यावरील काळोखात रात्रीला सुरू असलेला तमाशा पाहता स्थानिक पत्रकारांनी याचा भंडाफोड करीत पोलिसांना पाचारण केले असता पोलिस येण्या आधी येथील प्रेमि युगुलांनी वाहनासह येथून पळ काढला रविवारी रात्री हा प्रकार येथे उघडकीस आला.पोलीस येण्या आधी प्रेमी युगुलांचे वाहनासह होणारे पलायन पाहता पोलीसांचे आशिर्वादाने येथे हे धंदे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता येथे हाँटेलची संख्या वाढली आहे.
 

 
 
 
पर्यटकांचे सोयीसाठी लाँजीगचा परवाना मिळवून उभे ठाकलेल्या काही हाँटेलमालकानी तर हॉटेलचे नावाखाली कुंटनखाना सूरू केला आहे. यामुळे या भागात शालेय विद्यार्थ्यी ,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सारखी वर्दळ वाढली आहे. या भागात तरूण तरूणी व अल्पवयीन मुलीची दिसणारी लुडबूड बरेच काही सांगून जाते. यापूर्वी या भागातील हाँटेलवर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात असे प्रकार उघडकीस आले असून या मल्हार हाँटेलवर रविवारी ता. 5 ला रात्री पोलिसांनी पाच जोडप्यांना अश्लील चाळे करताना रंगेहात पकडले याप्रकरणी पुढील कारवाई न करता प्रकरणाची परस्पर विल्हेवाट लावली गेली. दोन दिवसांपूर्वी प्रसार माध्यमाने याबाबत वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतरही येथे या हाँटेलवर असे प्रकार राजरोसपणे सुरू असून याला पोलिसांचा आशिर्वाद असल्याचे उघड बोलल्या जात आहे. पोलीसांना हाताशी धरुन हे सगळे सुरू असल्याने हाँटेल मालकाचे मनोबल वाढले आहे. रविवारी रात्री 10.20 वाजताचे दरम्यान येथे आपल्या टिएस 20/3680 क्रमाकांचे लाल रंगाच्या अँक्टीवा स्कुटीने वास्तव्यास आलेल्या प्रेमी युगुलांत काही तरी बिनसले त्यामुळे या एका तरूणीने येथून पळ काढावा लागला ती रस्त्याने पुढे जात असताना स्कुटीने आलेला तरूण मागावर होता तो तिला गाडीवर बसण्यासाठी आग्रह करत असताना ती नकार देत रडत पुढे पायी चालत होती हा सूनसान रस्त्यावरील रात्रीचे आंधारातील प्रकार हिंगणी कडून येणाऱ्या पत्रकारांचे नजरेत पडताच त्यांनी दोघांची कान उघाडणी करताच त्यांनी गाडी घेऊन शिवणगाव मार्गावरील दुमजली हाँटेलकडे धुम ठोकली हा सगळा प्रकार पाहून पत्रकारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिस येण्या पूर्वी पाच मिनिट आधी हाँटेल मालकाचे सांगण्यावरून वाहनासह पलायन केले यापैकी लाल स्कुटीवर दोन महाविद्यालयीन तरुणी व नॅनो कारने. एक युवक वर्धेकडे तर एक प्रेमी युगल शिवणगाव कडे पलायन केले.यानंतर तिथे आलेल्या पोलिसांनी रजिस्टर वरील नोंदी तपासल्या असता पाच जणाची नावे लिहिली होती दोन कान्होलीबारा तर तिन वर्धा येथील असल्याचे दिसून आले येथे तरूणींचे नावाची नोंद नसुन त्यांचे आयडी फ्रुफ त्यांचेकडे नव्हते यावरून बोगस नोंदीचे आधारे खोली उपलब्ध करून दिली जात असल्याचे स्पष्ट होत आहे नियम धाब्यावर बसवून हा सर्व खटाटोप केवळ कमाईचे साधन बनला आहे. हाटेल मालकाची मुजोरी। हया सगळया प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर हाँटेल मालकाने या सर्व गोष्टींची कबुली देत बंद करायचे असेल तर सगळ्यांचे करा असे मत व्यक्त करत आपली मुजोरी कायम ठेवली, येथे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असून ते अशा वेळी बंद ठेवून झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे सत्यता पडताळून पाहण्यासाठी अडचणी निर्माण करण्यात हाँटेल मालकाचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व गंभीर बाबीची दखल घेऊन सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे