टाकीतील गाळ काढताना तिघांचा गुदमरून मृत्यू

    दिनांक :11-May-2019
पाच कामगार गंभीर अवस्थेत
 
ठाणे: निवासी सोसायटीमधील टाकीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली. अन्य पाचजणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
माहितीनुसार, ठाण्यातील ढोकळी नाका येथील प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरिया सोसायटीमधील सिव्हरेज सेफ्टी टँक साफ करण्याचे काम आठ कामगारांना दिले होते. गुरुवारी दुपारपासून टाकीतील पाणी काढणे सुरू होते. त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास गाळ काढण्यासाठी सर्वजण आत उतरले. मात्र, टाकीतील वायुमुळे अमित पहाल, अमन बादल, अजय बुंबक या तिघांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस, अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ धाव घेत पाचजणांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. सध्या अन्य पाच कामगारांवर मेट्रो रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व कामगार मूळचे हरयाणातील असून, कामानिमित्त ते मुंबईत आले होते.