आयटीसीचे अध्यक्ष देवेश्वर यांचे निधन
   दिनांक :11-May-2019
नवी दिल्ली, 
प्रख्यात  उद्योगपती आणि आयटीसीचे अध्यक्ष वाय. सी. देवेश्वर यांचे आज शनिवारी अल्प आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.2017 मध्ये त्यांनी आयटीसीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता, तथापि त्यांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांना अशासकीय अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आले होते. गुरुग्राम येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
 

 
 
सुरुवातीला सिगारेटचे उत्पादन करणार्‍या आयटीसी कंपनीला देवेश्वर यांनी एफएमसीजी, हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही वर आणले होते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.