नेयमारवर तीन सामन्यांची बंदी

    दिनांक :11-May-2019
फ्रेंच चषकाच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर चाहत्याला मारहाण केल्याप्रकरणी पॅरिस सेंट-जर्मेनचा आघाडीवीर नेयमार याच्यावर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
 
 
नेयमारवरील बंदी १३ मेपासून सुरू होईल, असे फ्रेंच फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. मात्र अँगर्सविरुद्ध शनिवारी होणाऱ्या लीग-१ स्पर्धेच्या सामन्यात नेयमारला खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रेन्नेसविरुद्ध पॅरिस सेंट जर्मेनला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. रेन्नेसने दोन गोलची पिछाडी भरून काढत २-२ अशी बरोबरी साधली आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय साकारला. याच वेळी पदक स्वीकारण्यासाठी जाताना नेयमारने चाहत्याला धक्काबुक्की केली.