पाकिस्तानचा नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचा प्रस्ताव
   दिनांक :11-May-2019
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या अधिकृत लष्करी संवादाच्या माध्यमातून पाकिस्तानने हा प्रस्ताव दिला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
 
 
 
दोन्ही देशांचे डीजीएमओ परस्परांच्या संपर्कात असून डीजीएमओ स्तरावरील चर्चे दरम्यान हा प्रस्ताव देण्यात आल्याची शक्यता आहे. पाकिस्तान एलओसीवर तैनात असलेले स्पेशल सर्व्हीस ग्रुपचे युनिट हटवण्यास तयार आहे. एसएसजी पाकिस्तानी लष्कराचे स्पेशल युनिट आहे. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांनी तोफखान्याचा वापर करु नये असेही पाकिस्तानने सुचवले आहे. पाकिस्तानच्या या प्रस्तावासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला अहवाल पाठवण्यात आला आहे.