‘पिछली बार क्या बोला था गणेश भाई को?’; पाहा नवाजुद्दीनचा लूक
   दिनांक :11-May-2019
तभा ऑनलाईन,
नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित ‘सेक्रेड गेम’ या वेब सीरिजचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी टीझरद्वारे या वेब सीरिजमधील कलाकरांची ओळख करून दिली होती. त्यानंतर आता या सीरिजमधील कलाकारांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.  
 
 
पोस्टरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा गणेश गायतोंडे ही व्यक्तीरेखा साकारणार असल्याचे दिसत आहे. नेटफ्लिक्सने नवाजुद्दीनच्या फोटो पोस्ट करताना ‘पिछली बार क्या बोला था गणेश भाई को ? औकात!’, असे कॅप्शन दिले आहे. पहिल्या भागांप्रमाणे दुसऱ्या भागातही भन्नाट संवाद असतील असे चाहत्यांच्या अपेक्षा आहेत. सैफ अली खान पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही सरताज सिंग ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. दुसऱ्या भागांमध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकार दिसणार आहेत. कल्की बात्यो अबल्मन ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर रणवीर शाहीद खान ही भूमिका वठविणार आहे.
 
 
दरम्यान, कथानक, तगडे कलाकार, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर ‘सेक्रेड गेम्स’ राज्य केले होते. पहिल्या भागामधील सैफ अली खान (सरताज सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा अध्यात्मिक गुरु) हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार आहेत. मात्र, पहिल्या पर्वामध्ये जितेंद्र जोशी (काटेकर), राधिका आपटे (अंजली माथुर), कुब्रा सेट (कूकू) या कलाकारांची उणीव दुसऱ्या भागांत कोण भरून काढणार याची उत्सुकता प्रेक्षकांनी लागली आहे. कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी शिवाय आणखी कोणकोणते नवीन कलाकार दुसऱ्या भागात असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.