मालेगाव स्फोटातील आरोपीने मागितली सुरक्षा

    दिनांक :11-May-2019
मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
 
मुंबई: मालेगाव स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे सांगण्यात येते.
मालेगाव स्फोटाच्या घटनेनंतर लगेच समीर कुलकर्णीला अटक करण्यात आली होती. त्याची भोपाळमध्ये प्रिंटिंग प्रेस आहे. या स्फोटात वापरलेल्या बॉम्बसाठी त्याने काही रासायनिक पदार्थ उपलब्ध करून दिले होते, असा त्याच्यावर आरोप आहे. इंदूर आणि भोपाळमध्ये झालेल्या स्फोटांच्या कटातही तो सामील होता, असाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. याच प्रकरणात साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित आणि मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय यांनाही जामीन मिळाला आहे.
दरम्यान, समीर कुलकर्णीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात कोणत्याही धमकी वा अन्य बाबीचा उल्लेख केला नसल्याचे समजते. तरीही आपणास विनाविलंब सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी विनंती त्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.