जाहिरात विश्वातही रणवीर-दीपिका नंबर १
   दिनांक :11-May-2019
मुंबई,
 
बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी आता जाहिरात विश्वातलीही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सनुसार,सेलिब्रिटी कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण टेलिव्हिजन जाहिरातविश्वातील सर्वाधिक पसंती असलेली जोडी ठरले आहेत.
 

 
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, रणवीर आणि दीपिका १०० गुणांसह यादीत पहिल्या स्थानी आहेत. वरुण आणि आलिया ही जोडी दुसऱ्या स्थानावर आहे. 'गली बॉय' चित्रपटात आणि त्यापूर्वी 'मेक माय ट्रिप'च्या जाहिरातीत झळकलेली रणवीर आणि आलियाची जोडीनं तिसरं स्थान पटकावलंय. तर, रणबीर-दीपिका ही एशियन पेंट्सची जाहिरात करणारी जोडी १६.६६ गुणांसह ही जोडी चौथ्या क्रमांकावर आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक, अश्वनी कौल याबाबत सांगतात की,'रणवीर -दीपिका जोडीने लागोपाठ तीन सुपरहिट चित्रपट दिले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यामुळे हे कपल सध्याचे सर्वाधिक चर्चित कपल आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या ६ वर्षांपासून ही बॉलिवूडची सर्वात आवडती जोडी आहे.'