बेंगळुरू-दिल्ली विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
   दिनांक :11-May-2019
नागपूर,
फ्युएल गेजमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे स्पाइस जेटचे बेंगळुरू ते दिल्ली जाणाऱ्या विमानाचा मार्ग बदलून ते मध्यरात्री दीड वाजता नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. पहाटे ५.३० पर्यंत प्रवासी विमानातच होते. त्यानंतर त्यांना उतरवण्यात आले. अजूनही दिल्ली जाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. सुमारे १५० प्रवासी विमानतळावर वाट बघत आहेत.
 
 
स्पाइसजेटचे काउंटर नागपूर विमानतळावर नाही. त्यामुळे कंपनीकडून प्रत्यक्ष कुणीही प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. विमानतळ प्राधिकरणाने केवळ चहा आणि पाण्याची सोय केली. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पहाटेपासून विमानतळावरच आहेत. रात्री ९.३० वाजता बेंगळुरू येथून उड्डाण केलेले विमान दिल्लीला मध्यरात्री १२.३० पर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. तांत्रिक अडचणीमुळे ते पोहोचलेले नाही.
एका प्रवाशाला अपेंडिक्सचा त्रास होता. त्याच्यासाठी रुग्णावाहिका आणायला अर्धा तास विलंब झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.