मोदीजी काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं; भाजपाचे सिद्धूंना प्रत्युत्तर
   दिनांक :11-May-2019
तभा ऑनलाईन  
नवी दिल्ली, 
काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळ्या भारतीयांवर केलेली टीका चुकीची आहे. मोदींना आणि भाजपाच्या सगळ्या नेत्यांना सिद्धू यांनी ‘काले अंग्रेज’ असा शब्द वापरला आहे. अत्यंत हीन पातळीवर जाऊन केलेली ही टीका आहे असे मत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले आहे. "मोदीजी काले हैं तो क्या हुआ दिलवाले है" असे म्हणत संबित पात्रा यांनी सिद्धू यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काळे इंग्रज आणि सोनिया गांधी भारतीय हा कोणता न्याय आहे? असा प्रश्न पात्रा यांनी सिद्धू यांना विचारला आहे. 
 
नवज्योत सिद्धू यांना एकच सांगायचे आहे, अपने इटालियन रंगपे इतना गुमाँ न कर २३ तारखेला हा रंगही उतरणार आहे असेही संबित पात्रा यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी मोदींची तुलना एका नवविवाहितेशी करताना मोदीजी हे नवविवाहितेसारखे आहेत जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करते. गेल्या पाच वर्षांपासून मोदी सरकारच्या काळातही हेच सुरू आहे, असे विधान केले आहे. तसेच सिद्धू यांनी मोदींना आणि भाजपाच्या नेत्यांना काळे इंग्रज अशी उपमा दिली. त्याचवरून भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धू यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
 
मोदीजी काळे इंग्रज आहेत, देशातली जनता काळे इंग्रज आहेत हे सिद्धू यांचे वक्तव्य त्यांची मानसिकता दाखवते. एवढंच नाही तर सिद्धू ज्या काँग्रेस पक्षाची भलावण करत आहेत त्या पक्षाचीही मानसिकता दाखवते असंही संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. भारताचे मोदींवर प्रेम आहे, मोदी भारतावर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही फक्त मोदींचाच नाही संपूर्ण देशाचा अपमान केला आहे असाही आरोप पात्रा यांनी केला आहे.