शोपियानमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
   दिनांक :12-May-2019
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार केले आहे. चकमक स्थळावरून शस्त्र आणि अन्य स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात आल्याचीही माहिती आहे. परिसरात शोधमोहीम अद्यापही सुरू आहे.
 
 
प्राथमिक माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील हिंदसीतापूर भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी परिसराची नाकेबंदी केली आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात लष्कराच्या जवानांनी जशास तसं उत्तर दिलं आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.