विरोधक मतपत्रिकेवरही संशय घेतील
   दिनांक :12-May-2019
ऑस्ट्रेलियन राजदूत हरिंदर सिद्धू यांचा  टोला 

 
 
नवी दिल्ली,
विरोधकांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाच, ऑस्ट्रेलियाने मात्र इव्हीएमचे कौतुक केले आहे. इव्हीएमद्वारे भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात मतदानाची प्रक्रिया हाताळणे इतके सोपे नाही, यासाठी निवडणूक आयोग कौतुकास पात्र आहे. इव्हीएमप्रमाणेच मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्यास त्याच्या प्रामाणिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात, असा टोला ऑस्ट्रेलियाचे राजदूत हरिंदर सिद्धू यांनी हाणला आहे.
 
 
 
 
 
सुमारे ८५ ते ९० कोटी मतदारांकांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची व्यवस्था कशी होऊ शकते, ही गोष्ट खरच प्रेरणादायी आहे. सुव्यवस्थित आणि निर्धारी निवडणूक आयोग आणि त्यांचे अधिकारी हेच या यशस्वी नियोजनामागील एकमेव उत्तर आहे. ही अतिशय चांगली आणि व्यवस्थित प्रणाली आहे, असेही त्यांनी सांगितले. सिद्धू यांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेचेही कौतुक केले. इव्हीएममुळे मी प्रभावित झालो आहे. ऑस्ट्रेलियात असे होत नाही. माझ्या मते, मतपत्रिकेची जी व्यवस्था आमच्या देशात आहे, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात, असे ते म्हणाले.