शेगांव नागझरी अकोला मार्गाच्या रुंदि करणाला सुरवात

    दिनांक :12-May-2019
झाडांच्या पुनर्वसनाची मागणी  
 
अकोला: युती सरकारने संपुर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांचे रुंदिकरणाचे काम हाती घेतले आहे शेगांव नागझरी अकोला या मार्गाचै कामसुध्दा जोरात सूरु आहे.
रस्ते विकासाच्या महामार्गावर गावांना नेतात त्यामुळे प्रत्येक गांव खेडे वाड्या मुख्य रस्त्याला जोडल्या गेले पाहीजे आणी विकासाची गंगा मोठ्या शहराकडुन लहान गावात पोहचली पाहीजे तोच उद्देश ठेऊन महाराष्ट्र युती सरकारने संपुर्ण महाराष्ट्रात रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर विकासासाठी हातात घेतले त्यातलाच अत्यंत महत्वपुर्ण मार्ग म्हणजे शेगांव अकोला हा दोन जिल्हायांना अत्यंत जवळ आणणारा मार्ग दिंडिमार्ग म्हणूनहि याची ख्याती आहे अकोल्यातून शेगांवला पाई वारी करणा-यांनी सर्वात प्रथम हा मार्ग अवलंबवला आता अकोल्यातून नागझरी पर्यंत हा मार्ग डांबरीकरणामुळे छोट्या वाहनांच्या वाहतूकिचा मुख्य मार्ग झाला आहे अकोला गायगांव निमकर्दा अडुळसाकडुळसा कसुरा नागझरी शेगांव असा हा 35कि मी चा मार्ग आहे.  संत गजानन महाराजांची पालखि पंढरीच्या वारीला याच मार्गाने जाते असा हा सदैव वर्दळीचा रस्ता रुंदिकरण होत आहे
हा रस्ता अकोल्याला रेल्वे गेटवर जातो तिथेही उड्डाण पुल होत आहे त्यामुळे गेटची समस्या सुटणारच आहे हा रस्ता रुंदिकरण होत असतांना या रुंदि करणाच्या मधे येणारी मोठी छोटी झाडे कापणे सध्या सुरू आहे ती कापल्या शिवाय रुंदिकरण होणारच नाही हे जरी खर असल तरी तीच झाड या रस्तयाची सौदर्य आहे पाई चालणा-यांना सावली देते त्यामुळे रूंदिकरणाच्या कामात झाडांची कटाई झाली तरी त्यानंतर दुप्पटिने झाडे लाऊन त्याचे संगोपण करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.