मंगरूळनाथ तालुक्यात लोकसहभागातुन जंगलात कृतीम पाणवठे तयार
   दिनांक :12-May-2019
मंगरुळनाथ: वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीरच्या पुढाकाराने आणी लोकसहभागातून जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करणार करन्यात आले असुन आता वन्यप्रान्यांना पान्याची व्यवस्था झाल्याने वन्यप्रान्यांना पाणी ऊपलब्ध झाले आहे.

 
 
सुर्य आग ओकतोय, तापमाना चा पारा ४७° अंशावर जाऊन पोहचला. त्यातच यावर्षी जिल्हात पर्जन्यमान कमी झाले. याचाच मोठा फटका मानव जाती बरोबरच मुक्या जीवांना, वन्यप्राण्यांना बसत आहे. घोटभर पाण्यासाठी वन्यप्राणी रानोमाळ भटकंती करीत आहे. याच भटकंती मुळे रस्ता ओलांडताना कित्येक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. काहींना अपंगत्व येते. भिषण पाणीटंचाई चा जोरदार फटका वन्यप्राण्यांना बसत आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी विहिरीत पडल्याच्या घटना काही वेगळ्या नाही.वन्यप्रान्यांसाठी जंगलात पाणी ऊपलब्ध करुन देन्याविषयी पञकार फुलचंद भगत यांनीही शासनाकडे मागणी केली होती. हिच गंभीर बाब लक्षात घेऊन वाशिम जिल्हा चे मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे व त्यांच्या वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम सदस्य व वन विभागाच्या मदतीने लोकसहभागातून वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. साहजिकच वाशिम जिल्हयात प्रादेशिक जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यात वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. हीच बाब डोळ्यापुढे ठेवुन मानोरा तालुक्यातील मेंदरा व मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळनाथ व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व लोकसहभागातून पाणवठे तयार करण्यात आले. यातील वनोजा येथील प्रादेशिक जंगलातील पाणवठा वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी सज्ज झाला असुन तो पाण्याने भरून वन्यजीवांच्या साठी मोकळा करण्यात आला. हे पाणवठे बनविण्यासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर च्या सदस्यांनी जीवापाड प्रयत्न केले. पाणवठ्या चे काम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी तीन्ही सांजा डोक्यावर पाणी नेऊन बांधकामांवर टाकले. व तरूणांच्या श्रमाने व लोकसहभागातून दर्जेदार व उत्कृष्ट पाणवठ्या ची निर्मिती झाली. साहजिकच या पाणवठ्या मुळे वन्यजीवांची पाण्यासाठी गावाकडे होणारी भटकंती त्यातुन उफाळून येणारा मानव-वन्यजीव संघर्ष कुठतरी कमी होण्यास नक्की मदत होईल. या टिम कडुन वाशिम जिल्हयात १०० पाणवठे लोकसहभागातून बनविण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यापैकी अवघ्या ६-७ दिवसात दोन पाणवठे बनुन तयार केले. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी सज्ज झाले. तसेच अजुन पाणवठे बनविण्यासाठी दानशुरांनी पुढाकार घ्यावा.या कार्यासाठी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर चे सदस्य गौरव कुमार इंगळे, सुबोध साठे, समरजीत रघुवंशी, श्रेयस वार्डेकर,शुभम ठाकुर, श्रीकांत डापसे, तसेच वनोजा शाखेचे अमर खडसे, चेतन महल्ले, आकाश कांबळे, वैभव गावंडे, शुभम हेकड, सतिश राठोड, सतिश गावंडे, ओम टोंचर, सौरव इंगोले, व आदित्य इंगोले हे अथक परिश्रम घेत आहेत.