आजचे राशी भविष्य, दि. १२ मे २०१९
   दिनांक :12-May-2019
मेष : मोठी कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. नाते-संबंधांची नव्यानं सुरुवात होईल. अविवाहीत व्यक्तींना विवाहाचे प्रस्तावही मिळू शकतील. मेहनतीसाठी तयार राहा... ऑफिसमध्ये तुमच्याकडून वरिष्ठांनाही काही महत्त्वाचे सल्ले मिळू शकतील.
वृषभ : नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. जे होतंय ते होऊ द्या... उगाचच विरोध करू नका... याचा तुम्हाला फायदाच होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राकडून तुमची मदत होईल. अविवाहीत व्यक्तींचे नाते जास्तीत जास्त घट्ट होतील.
 
मिथून : आज तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमचे विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराला एखाद्या महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी मदत करा. पैशांसंबंधीत काही गोष्टी सुधाराव्या लागतील... शांततेत घ्या, धैर्य ठेवा... मित्रांसोबत वेळ घालवा.
कर्क : तुमच्यासाठी दिवस चांगला असेल. प्रयत्न केले तर गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडाल... आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला यासाठी इतरांचीही मदत मिळू शकते.
सिंह : नव्या लोकांशी ओळखी होती. खूप लोक तुमच्या मदतीला धावून येतील. आज तुम्ही खूप भावनिक व्हाल. दीर्घकाळापासून एखादी महत्त्वाची गोष्ट राहून जात असेल तर ती आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही नवीन मित्र आयुष्यात येऊ शकतात. नात्यांत परिपूर्णततेची जाणीव होईल.
कन्या : जे काम करण्याची जबाबदारी तुम्हाला मिळाली आहे ते आनंदाने स्वीकार करा. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी नवनवीन आयडिया तुमच्या डोक्यात डोकावत राहतील. पैशांची कामं मार्गी लागतील. 
तूळ : प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कराल. नोकरी बदलण्याचा मानस असेल तर कामाला लागा... मित्र-परिवार आणि कुटुंबासोबत छान वेळ व्यतीत होईल. जुन्या आव्हानांवर उत्तर मिळेल. आज तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल.
वृश्चिक : इतरांनी केलेल्या उत्स्फुर्त मदतीमुळे कामं मार्गीस लागतील. आर्थिक चणचण दूर होईल. कौटुंबिक वाद किंवा तत्सम प्रश्न सुटतील. जोडीदारासोबतच्या नात्यावर लक्ष द्या. नोकरदार वर्गाच्या परिस्थितीत सुधार पाहायला मिळेल.
धनु :  आज आपला पूर्ण वेळ आपल्या लक्ष्यावर केंद्रीत करा. महत्त्वकांक्षा वाढीस लागतील. कायदेशीर बाबी मार्गी लागतील. जमिनीबद्दलचे व्यवहार पूर्ण होऊ शकतात.
मकर : एका वेळी एकच काम हाती घ्या. कामकाज धोरणाला लागल्यामुळे मनही शांत राहील. प्रेम संबंधात नवीन ऊर्जा मिळू शकते. प्रवासाचीही दाट शक्यता आहे. जबाबदाऱ्या वाढीस लागतील.
कुंभ :  एखादी खास जबाबदारी हाती येऊ शकते. काम, गुंतवणूक किंवा व्यवसाय यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घ्याल. नव्या अनुभवांसाठी तयार राहा. दाम्पत्य आयुष्य सुखकारक राहील.
मीन : पुढे जाण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल. कामातील अडचणी दूर होतील. तुमचा जमा-खर्चाचा ताळमेळ बसवाल. या दरम्यान एखादा छोटा प्रवासही होऊ शकतो. मुलांसोबत संबंध आणखी दृढ होतील. रेंगाळलेल्या कामांसाठी इतरांच्या अनुभवाची जरूर मदत घ्या.