सामन्याआधी कर्णधार धोनी चिंतेत; 'हे' आहे कारण

    दिनांक :12-May-2019
बाराव्या हंगामाच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश नक्की केला. दिल्लीने विजयासाठी दिलेलं आव्हान चेन्नईने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अंतिम फेरी गाठण्याची चेन्नईची ही आठवी वेळ ठरली आहे. विजेतेपदासाठी चेन्नईला मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. मात्र या सामन्याआधी कर्णधार महेंद्रसिंह धोनी चिंतेत पडला आहे.
 
 
 
अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नईचे फलंदाज चांगल्या फॉर्मात नाहीयेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकावली, मात्र तरीही धोनीच्या दोन्ही सलामीवीरांकडून आणखी अपेक्षा आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीने आपलं स्पष्ट मत बोलून दाखवलं. “सलामीवीरांनी आणखी चांगली कामगिरी करावी अशी माझी अपेक्षा आहे. ज्यावेळी तुम्हाला ६ पेक्षा कमी धावगतीने लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो, त्यावेळी तुम्हाला मोठे फटके खेळण्याची गरज भासत नाही. आतापर्यंत त्यांनी खूप मेहनत केली आहे. अंतिम सामन्यात ते अजून चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.”
.