आतापर्यंत रंगलेले आयपीएलचे अंतिम सामने

    दिनांक :12-May-2019
विशाखापट्टणम,
 
बाराव्या आयपीएल मोसमात गतविजेता चेन्नई सुपर किंग्जसमोर माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज व  मुंबई इंडियन्स तीनवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले आहेत. यात मुंबईने 2 वेळा, तर चेन्नईने 1 वेळा बाजी मारली आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे रविवारी या दोन संघात होणार्‍या आयपीएलच्या या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यात विजय मिळवून आयपीएलची 4 विजेतेपदे मिळवणारा पहिला संघ होण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
 

 
.
मुंबई यावर्षी पाचवा अंतिम सामना खेळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तीनवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कोलकता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबादने दोनवेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. तसेच रायिंझग पुणे सुपर जायण्ट्स, राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स व किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रत्येकी एकवेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे.
आतापर्यंत रंगलेले आयपीएल अंतिम सामने -
2008 - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (विजेता- राजस्थान रॉयल्स)
2009 - डेक्कन चार्जर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (विजेता - डेक्कन चार्जर्स)
2010 - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (विजेता- चेन्नई सुपर किंग्ज )
2011 - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (विजेता - चेन्नई सुपर किंग्ज )
2012 - कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (विजेता - कोलकता नाईट रायडर्स)
2013 - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (विजेता- मुंबई इंडियन्स)
2014 - कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (विजेता - कोलकता नाईट रायडर्स)
2015 - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज  (विजेता- मुंबई इंडियन्स)
2016 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (विजेता- सनरायझर्स हैदराबाद)
2017 - रायिंझग पुणे सुपरजायण्ट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (विजेता- मुंबई इंडियन्स)
2018 - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (विजेता- चेन्नई सुपर किंग्ज )
2019 - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (विजेता - ?)