IPL 2019 : मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपरकिंग्स, आज कोण बाजी मारणार?

    दिनांक :12-May-2019
हैदराबाद,
 
आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स रविवारी जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने असतील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव मिळण्याची आशा आहे.
 
मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये दाखल होण्याच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश होता. स्पर्धेच्या या टप्प्यात त्यांनी तीनवेळा चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केलेला आहे. त्यात मंगळवारी चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायरचाही समावेश आहे.
दरम्यान, आकडेवारीचा विचार केला तर कुणाला पसंती दर्शविता येत नाही. कारण दोन्ही संघ अनेकदा फायनलमध्ये पोहोचलेले असून, अनेकदा जेतेपदही पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने आतापर्यंत चारवेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात तीनवेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यापैकी दोनदा २०१३ व २०१५ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केलेला आहे.
 


 
दुसऱ्या बाजूचा विचार करता तीनवेळा जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यांच्यासाठी यंदाचे सत्र शानदार ठरले. विशेषत: गेल्यावर्षी दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन करीत जेतेपद पटकावले होते. चेन्नईला अंतिम लढतीपूर्वी आपली रणनीती योग्यपद्धतीने तयार करावी लागेल. कारण यंदाच्या मोसमात मुंबई संघाने त्यांचा तीनवेळा पराभव केलेला आहे. रोहितच्या फलंदाजांना चेन्नईच्या फिरकीपटूंना समर्थपणे तोंड द्यावे लागले.
 
मुंबई संघाला चार दिवस विश्रांती घेण्याची संधी मिळली. आता हा संघ धोनीच्या संघाविरुद्ध यंदाच्या मोसमातील चौथा विजय व आयपीएलमध्ये चौथे विजेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. आ
संभाव्य संघ
 
चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (कणर्धार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, शेन वॅटसन, फॅफ डू प्लेसिस, मुरली विजय, रविंद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिशेल सॅन्टनर, शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा, केएम असिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कगलेईन.
 
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कणर्धार), क्विन्टॉन डी कॉक, सुयर्कुमार यादव, युवराज सिंग, केरॉन पोलार्ड, हार्दिक पंडया, कृणाल पंडया, मिशेल मॅकक्लॅघन, मायंक मार्कंडे, राहुल चहर, जसप्रित बुमराह, अनमोलप्रित सिंग, सिद्धेश लाड, अंकुल रॉय, इव्हिन लुईस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन, आदित्य तरे, रसिक सलाम, बरिंदर सरण, जयंत यादव, ब्यूरन हेन्ड्रिक्स, मलिंगा.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून.