कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेचा आज पासून शुभारंभ

    दिनांक :12-May-2019
कोल्हापूर: कोल्हापूरकरांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेणे आता अधिक सुखकर झाले आहे. प्रवाश्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर ते  तिरुपती विमानसेवेचा आजपासून शुभारंभ झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच  दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर इंडिगो कंपनीकडून विमानसेवा सुरू होत असून याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर विमानतळावरुन दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे.  तिरूपतीसह कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर ‘इंडिगो’ कंपनीकडून विमानसेवा सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. या विमानसेवेबरोबर कोल्हापूरचीही विमानसेवा विस्तारत असून, यापुढे कोल्हापूर विमानतळावर दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे.