मोदींना माझ्याबद्दल द्वेष : राहुल गांधी
   दिनांक :12-May-2019
 शूजलपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल, माझ्या आजीबद्दल प्रचंड द्वेष आणि तिरस्कार आहे. त्याचमुळे ते माझ्यावर शाब्दिक हल्ला करतात. माझ्या वडिलांवर, आजीवर टीका करतात. त्यांच्याबद्दल तिरस्कार पसरवतात. मला मोदींच्या मनातून हा द्वेष आणि तिरस्कार संपवायचा आहे. म्हणूनच मी त्यांना प्रेमाने आिंलगन दिले होते. माझ्या मनात मोदींबाबत आपुलकी आहे. द्वेष किंवा तिरस्कार नाही, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशातल्या शूजलपूर या ठिकाणी झालेल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले. अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आिंलगन दिले होते. त्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यावर आज शनिवारी राहुल गांधी यांनी उत्तर दिले.