IPL: मुंबईचा चेन्नईवर रोमांचक विजय
   दिनांक :12-May-2019
हैदराबाद : भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले. मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. वॉटसनचा अपवाद वगळता एकाही चेन्नईच्या फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले. मुंबईच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाढलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पण कालांतराने त्यांनी ठराविक फरकाने फलंदाज गमावले. पण यावेळी अपवाद ठरला तो शेन वॉटसन. आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी न करू शकलेल्या वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईचे आव्हान जीवंत ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना वॉटसनने अर्धशतक झळकावले. ही खेळी साकारताना वॉटसनला तीनवेळा जीवदान मिळाले.
प्ले ऑफ्स च्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने १५ धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला लवकर माघारी परतावे लागले. त्याने केवळ ७ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश होता. मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला. पांड्याने DRS ची मदत घेतली, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने १६ धावा केल्या. अखेर कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.