'माझ्या जातीवरून काँग्रेसने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला'
   दिनांक :12-May-2019
नवी दिल्ली,
उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील प्रचार रॅलीत मोदींनी विरोधकांवर टीका केली. काश्मीरमधील काही दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले. त्यामुळे काही लोकांनी याचा विरोध केला. मतदानादिवशी मोदींनी दहशतवाद्यांना मारले, असे म्हणत काही विरोधकांनी माझ्यावर टीका केली, असे मोदी म्हणाले 
 
 
 
 
या रॅलीत मोदींनी काँग्रेस आणि सपा-बसपावर सडकून टीका केली. पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून यात विरोधक भूईसपाट झाले आहेत, असे ते म्हणाले. देशातील जनता एकजुटीने मोदींना मतदान करीत आहेत. काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी त्यांनी कोळसा घोटाळा केला. आम्ही सत्तेत आलो तर आम्ही गरिबांसाठी घरे निर्माण केली, असे मोदी म्हणाले. राजस्थानमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून सुद्धा मोदींनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. राजस्थानमध्ये दलित मुलीवर बलात्कार झाला असून यावर काँग्रेसने मौन का पाळले आहे, असा सवालही मोदींनी यावेळी विचारला.
 
 
शीख दंगलीवरील 'हुआ तो हुआ' या वक्तव्यावरही मोदींनी निशाणा साधला. शीखांची हत्या झालेली असताना काँग्रेसचे लोक 'हुआ तो हुआ' म्हणतात. माझ्या जातीवरून काँग्रेसने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण माझी जात एकच आहे, ती म्हणजे गरीब, असंही मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील मतदान हे १९ मे रोजी होणार आहे. शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाझीपूर, चंदोली, मिर्झापूर, रॉबर्ट्सगंज या ठिकाणी मतदान पार पडणार आहे.