बंगालमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला
   दिनांक :12-May-2019
पश्चिम बंगालमधील घाटल येथील भाजपच्या उमेदवार भारती घोष यांच्या गाडीवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच बंगालमधील भाजप प्रमुख दिलीप घोष यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारती घोष यांच्या कारगाडीची तोडफोड केली असून त्यांना एका मतदान केंद्रावर जाण्यापासून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रोखले. यामुळे त्यांना रडू कोसळले. या हल्ल्यामागे तृणमूल कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
 
 
माजी आयपीएस भारती घोष कधीकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून मानल्या जात होत्या. मात्र त्या आता भाजपकडून निवडणूक लढवित असून त्यांच्या विरोधात तृणमूलने दीपक अधिकारी यांना रिंगणात उतरवले आहे.