दुष्काळाकडे गांभीर्याने पहिले नाही तर सरकारचा बंदोबस्त करू- शरद पवार

    दिनांक :12-May-2019
सातारा : सरकारने  दुष्काळाकडे गांभीर्याने न पाहिल्यास या सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवारांनी आज साताऱ्यातल्या चारा छावणीला भेट दिली. यावेळी शेतकर्‍यांना प्रत्येक जनावरामागे सव्वाशे रुपये अनुदान मिळावे , अशी मागणीही त्यांनी केली. 
 

 
 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, असे शरद पवार यांनी याआधीच सांगितले होते. यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने  विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या गावातील सरपंचांशी फोनवर संपर्क साधला आणि पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्यासंबंधित समस्या जाणून घेऊन त्याचे तात्काळ निवारण केले. याशिवाय जिल्हा पालक सचिवांना दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आपापल्या जिल्ह्याचा आढावा घेण्याचे आदेशही दिले आहेत.