‘या’ अभिनेत्याने वाटले नऊ ट्रक आइस्क्रीम!
   दिनांक :12-May-2019
‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. याच विजयने अलीकडे आपला ३० वा वाढदिवस साजरा केला असून त्याने नऊ ट्रक भरून आइस्क्रीम वाटले.
 
 
आपल्या वाढदिवशी विजयने चाहत्यांना एक अनोखी भेट दिली. त्याने पाच राज्यांतील सात शहरात भरभरून आइस्क्रीम वाटले. हैदराबाद, विजयवाडा, तिरुपती, बंगळुरू, चैन्नई आणि कोची या पाच शहरात त्याने आइस्क्रीमचे वाटप केले. यासाठी तब्बल ९ ट्रक आइस्क्रीम लागले. हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात त्याने स्वत: जाऊन चाहत्यांना आइस्क्रीम वाटले. गत वषीर्ही विजयने सुमारे ४ ते ५ हजार आइस्क्रीम वाटले होते.
 
 
यंदा ‘फोर्ब्स’ने जारी केलेल्या ३० वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये विजय देवरकोंडाचे नाव आहे. आश्चर्य वाटेल, पण विजय २५ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बँक अकाऊंटमध्ये ५०० रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. त्यामुळे बँकेने त्याचे अकाऊंट लॉक केले होते. पण केवळ पाच वर्षांत विजय ‘फोर्ब्स इंडिया’च्या ३० वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये जाऊन बसला.