...म्हणून घाबरला होता सिंघम
   दिनांक :12-May-2019
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडमध्ये अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत सिंह हजेरी लावणार आहेत. त्यांच्या दे दे प्यार दे या आगामी चित्रपटाचे ते या कार्यक्रमात प्रमोशन करणार असून कपिलच्या टीमसोबत ते गप्पागोष्टी करणार आहेत. तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट देखील शेअर करणार आहेत. 
 
 
 
 
 
 अजय खऱ्या आयुष्यात खूपच शांत आहे असे अनेकांना वाटते. पण तो चित्रपटाच्या सेटवर प्रँक करण्यात तरबेज आहे. पण एका चित्रपटाच्या सेटवर चक्क तो घाबरला होता आणि त्यानेच ही गोष्ट कपिलच्या शो मध्ये सांगितली आहे.
त्याने सांगितले की, भूत या चित्रपटाचे चित्रीकरण एका बिल्डिंगमध्ये सुरू होते. मी चित्रीकरणासाठी लिफ्टमधून जात होतो. पण लिफ्टमध्येच अडकली आणि लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर येऊन आदळली. मी त्या लिफ्टमध्ये जवळजवळ दीड तास होतो. मी या घटनेमुळे प्रचंड घाबरलो होतो. आमच्या चित्रपटाचे चित्रीकरण हे 28 व्या मजल्यावर सुरू होते. मी त्यानंतर चित्रीकरणाला लिफ्टने न जाता चालत जात असे. तसेच मी दिवसातून तीन-चार वेळा चढ-उतार करायचो.
अजय देवगण या घटनेनंतर इतका घाबरला होता की, त्याने घराच्या लिफ्टचे देखील दरवाजे बदलून तिथे पारदर्शक दरवाजे बसवले.