देसाईगंज येथे जागतिक परिचारिका दिन साजरा

    दिनांक :12-May-2019
 
देसाईगंज: देसाईगंज येथिल ग्रामिण रुग्णालयात आज दि,१२ ला जागतिक महिला दिन व सिस्टर्स डे च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हनुण वैद्यकिय अधिकारी डॉ, ईकबाल बेग,वैद्यकिय अधिकारी कु,मृणाल नाकाडे, वैद्यकिय परिचारिका मेरी विल्सन, गणेश मोरे,धम्मजोती मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मार्गदर्षन करतांना डॉ ईकबाल बेग म्हणाले की समाजात स्ञीयांचे महत्व कधिच कमी होऊ शकत नाही, परिवारात आई बहिण ज्या प्रमाने कुटुंबातिल व्यक्तींची सेवा करते त्या भावनेतुनच परिचारिका रुग्णांची सेवा करतात या कर्तव्यात अनेक अडचनी येत असतात पण संकोच न बाळगता परिचारिका कर्तव्य बजावतात ही अतिशय गौरवाची बाब आहे. जागतिक परिचारिका दिवस फ्लॉरेन्स नाईटिंगल यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन सुरु करण्यात आले.फ्लॉरेन्स नाईटिंगल यांनी आपले संपुर्ण जिवन कार्य रुग्ण सेवेत घालविले,रुग्णांची सेवा करतांना त्यांनी कधिच संकोच बाळगले नाही. मृतप्राय रुग्णांची सेवा करतांना त्यांचे कार्य जिवनज्योती प्रमाणे होते म्हनुण त्यांना लेडी विथ लैंप असे संबोधले जायचे आपण सर्व रुग्णालयात रुग्णांची सेवा करतांना फ्लॉरेन्स नाईटटेंगल यांची प्रेरणा मणात ठेवुन कार्य करावे असे आवाहनही या प्रसंगी केले. या कार्यक्रमाला परिचारिका मिऩाक्षी कडते,शिल्पा चांदेकर,सचिन खोब्रागडे,नैना सहारे,आराधना मडावी,रेखा कुसराम,कपिला माटे,स्नेहा तितिरमारे,रोशनी खोब्रागडे,मयुरी तेलंग,कांचन ऊईके,आनंद किरसान इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.