जागतिक रिलेत भारताची निराशा

    दिनांक :12-May-2019
योकोहामा, 
 
जागतिक रिले स्पर्धेत पुरुष व महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत भारतीय चमूने निराशा केली. या दोन्ही विभागात भारताला 17 वे स्थान मिळाले, तर मिश्र 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत 15 वे स्थान मिळाले.
 
 
 
हिमा दास, एम.आर. पूवाम्मा, सरिताबेन गायकवाड व व्ही.आर. विस्मया यांचा समावेश असलेल्या महिला चमूने हिट क्रमांक तीनमध्ये 3 मिनिट 31.93 सेकंद अशी, तर कुन्हू मुहम्मद, जितू बेबी, जीवन सुरेश व मोहम्मद अनस यांचा समावेश असलेल्या पुरुष संघाने हिट दोनमध्ये 3 मिनिट 06.05 सेकंद अशी वेळ नोंदविली. जितू बेबी, सोनिया बैश्या, प्राची व अॅन्थोनी अॅलेक्सचा समावेश असलेल्या मिश्र रिले चमूने 3 मिनट 23.59 सेकंदाची वेळ दिली.
 
आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दोहा येथे होणार्‍या विश्व अॅथ्लेटिक्स स्पर्धेसाठी पुरुष व महिलांच्या 4 बाय 400 रिलेसाठी अव्वल 10 चमू, तर मिश्र 4 बाय 400 मी. रिलेसाठी अव्वल 12 चमू पात्र ठरणार आहेत