प्लंकेटनं बॉल टॅम्परिंग केलीच नाही; आयसीसीकढून क्लिन चीट

    दिनांक :13-May-2019
लंडन,
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडल्याची चर्चा होती. इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेटने चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) प्लंकेटनं असं काहीच चुकीचं केलं नसून त्याला क्लिन चीट दिली आहे. 
 
 
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी यावेळी दमदार सुरुवात केली आणि संघाला शतकी सलामी करून दिली. बटलर जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडची 35.1 षटकांत 3 बाद 211 अशी स्थिती होती. बटलरने खेळपट्टीवर आल्यापासूनच गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बटलरला यावेळी कर्णधार इऑन मॉर्गनची चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची अभेद्य भागीदारी रचली. मॉर्गनने 48 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 71 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या फाखर जमान ( 138), बाबर आझम ( 51), आसीफ अली ( 51), सर्फराज अहमन ( 41*) आणि इमान उल-हक ( 35) यांनी तुफानी खेळी केली. पण, 12 धावांनी त्यांचा विजय हुकला. ऑस्ट्रेलियाचा चेंडू कुरतडण्याचा प्रसंग ताजा असताना इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेट याने चेंडू कुरतडण्याचा प्रताप केला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा प्रताप व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्सकडून प्लंकेटवर कारवाई करण्याची मागणी झाली होती.
आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास केला. पण, त्यांनी प्लंकेटला क्लिन चीट दिली.'सामनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉल टॅम्परिंगसारखा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसे पुरावेही नाहीत,'' अशी प्रतिक्रीया आयसीसीनं दिली.