दुष्काळ : पाणी चोरीला गेल्याने पोलिसात तक्रार दाखल

    दिनांक :13-May-2019
मनमाड : अगदी काही वर्षांआधी एखाद्याला पाण्याची गरज भासल्यास नैतिक कर्तव्य म्हणून लोक सहज पाणी देत असे. पण आता दुष्काळाने परिसीमा गाठल्याने मनमाड शहराचा पाणी प्रश्न इतका गंभीर झाला आहे की आता चक्क साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे.मनमाडच्या श्रावस्ती नगर भागात एका नागरिकाने घराच्या छतावर साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून ३०० लिटर पाणी चोरी झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.
 
 
मनमाड शहर गेल्या चार दशकांपासून मनमाडकर तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात . अत्यल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदर्डी धरण कोरडेठाक आहे तर पालखेडच्या आवर्तनावर मनमाडच्या पाण्याची भिस्त आहे . पालिकेकडून महिन्यातुन एकादाच पाणी पुरवठा केला जातो .त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करतात मनमाडच्या श्रावस्ती नगर भागात राहणाऱ्या विलास आहिरे यांनीही आपल्या घरावर पाचशे लिटरच्या पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या होत्या त्यापैकी एका टाकीतून अज्ञात चोरट्यांनी चक्क ३०० लिटर पाणी चोरून नेले . त्यामुळे आहिरे यांच्या कुटुंबाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली. पाणी चोंरांना शोधण्याचे मोठे आव्हान . तर दुसरीकडे पाणी चोरी झाल्याने पुढच्या काळात ;आहिरे परिवारावर पाण्याची शोधाशोध करण्यकची वेळ आली आहे .