वर्ध्यात चालत्या कारने घेतला पेट; गाडी जळून खाक
   दिनांक :13-May-2019

 
तभा ऑनलाईन टीम
वर्धा,
शहरातील रिंगरोडवरील साटोडा चौकात एका कारने अचानक पेट घेतला. कारला आग लागल्याचे लक्षात येताच कार थांबवत चालक गाडीच्या बाहेर पडला. त्यामुळे यामध्ये जीवीतहानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली आहे. या कारचालकचे नाव गिरीश शर्मा असून ते कांदिवली मुंबई येथील रहिवासी आहेत. ते यवतमाळवरून नागपूरला जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी या घटनेची रामनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे.