सार्वजनिक जीवनासाठी मायावती अपात्र; अरुण जेटली यांचा चिमटा
   दिनांक :13-May-2019
नवी दिल्ली, 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करणार्‍या बसपा नेत्या मायावती या सार्वजनिक जीवनात कायम राहण्यासाठी अपात्र ठरल्या आहेत, असा चिमटा केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी आज सोमवारी काढला.
 
 
 
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला जाणार्‍या भाजपा नेत्यांच्या बायकांच्याही मनात भीती असते, असे बेताल वक्तव्य मायावती यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जेटली यांनी जोरदार केला.
 
 
 
मायावती यांना सध्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचा राज्यकारभार सर्वाधिक वाईट असाच होता. त्यात आज त्यांनी पंतप्रधानांवर व्यक्तिगत आरोप करून, अतिशय खालचा स्तर गाठला आहे. आपण सार्वजनिक जीवनात राहण्यासाठी अपात्र आहोत, हेच त्यांनी यातून सिद्ध केले आहे, असे एकामागोमाग टि्‌वट जेटली यांनी केले.