श्रीलंकेत सोशल मीडियावर बंदी

    दिनांक :13-May-2019
श्रीलंकेत झालेल्या मशीदीवरील हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या सरकारने व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि युट्युबसारख्या सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मशीदीवर झालेल्या हल्ल्यानंतर सरकारने रविवारी चिलाऊ आणि अन्य ठिकाणी कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता.
 
 
फेसबुकवर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर चिलाऊ भागातील मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजामध्ये दंगे उसळले होते. स्थानिकांच्या मते चिलाऊ भागात ख्रिस्ती समाजातील बांधवांची संख्या अधिक आहे. संबंधित व्यक्तीने टाकलेली पोस्ट ही धमकीची असल्याची धारणा येथील लोकांमध्ये झाल्यामुळे हे दंगे उसळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या फेसबुक पोस्टनंतर जमावाने तीन मशीदी आणि मुस्लीम नागरिकांच्या दुकानावर दगडफेक केली. या घटनेनंतर संबंधित परिसरात रविवारी कर्फ्यू लावण्यात आला. तसेच सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली.